Thursday, March 16, 2023
जन्मापासून पडणा-या काही प्रश्न
साडेसाती _ चिंतन
ब्रह्म वाक्य, निर्वाण षटकम्, आणि अष्टावक्र संहिता
॥ ब्रह्म वाक्य ॥
1) अहं ब्रह्मास्मि - "मैं ब्रह्म हूँ" ( बृहदारण्यक उपनिषद १/४/१० - यजुर्वेद)
2) तत्त्वमसि - "वह ब्रह्म तू है" ( छान्दोग्य उपनिषद ६/८/७- सामवेद )
3) अयम् आत्मा ब्रह्म - "यह आत्मा ब्रह्म है" ( माण्डूक्य उपनिषद १/२ - अथर्ववेद )
4) प्रज्ञानं ब्रह्म - "वह प्रज्ञानं ही ब्रह्म है" ( ऐतरेय उपनिषद १/२ - ऋग्वेद)
5) सर्वं खल्विदं ब्रह्म- "यह सब ब्रह्म ही है" ( छान्दोग्य उपनिषद ३/१४/१- सामवेद )
--------------------------------------------------------------------------------------------------
॥ निर्वाण षटकम्॥
मनोबुद्ध्यहङ्कारचित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्रणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुश्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥१॥
न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशाः ।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायू चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥२॥
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षश्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥३॥
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥४॥
न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यश्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥५॥
अहं निर्विकल्पॊ निराकाररूपॊ विभुत्वाञ्च सर्वत्र सर्वेद्रियाणाम ।
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयश्चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम ॥६॥
मराठी अनुवाद:
***
मी मन, बुद्धी, अहंकार नाही. मी पञ्चेंद्रिये (त्वचा, डोळे, नाक, जिव्हा, कान) नाही.
मी पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश यांच्या पैकीही नाही.
मी विशुद्ध उर्जा आहे, चिरंतन आनंद आहे, मी शिव आहे.
मी प्राण नाही, पञ्चवायु ही नाही, मी सप्तधातु नाही, पञचकोश ही नाही,
मी वाणी नाही, हात नाही, पाय नाही, उत्सर्जन इंद्रिये ही नाही
मी विशुद्ध उर्जा आहे, चिरंतन आनंद आहे, मी शिव आहे.
मला द्वेष, घृणा, क्रोध, राग, लोभ, मोह वाटत नाही.
मी धर्म, संपत्ती, काम, मोक्ष या सर्वांच्या पलिकडे आहे.
मी विशुद्ध उर्जा आहे, चिरंतन आनंद आहे, मी शिव आहे.
मी पुण्य, पाप, सुख, दु:ख, मंत्र (कर्मकांड), तीर्थ (मंदिर), यज्न, वेद यांत गुतलेलो नाही
मी भोग्य वस्तु नाही, मी भोगण्याचा अनुभव नाही, मी भोक्ता ही नाही.
मी विशुद्ध उर्जा आहे, चिरंतन आनंद आहे, मी शिव आहे.
मला मृत्युची भीती नाही, जाती-धर्मांमध्ये भेदभाव करात नाही.
मला कोणी आईबाप नाहीत, माझा जन्मच कधी झाला नाही.
मला भाऊ, मित्र, गुरु आणि शिष्याही नाहीत.
मी विशुद्ध उर्जा आहे, चिरंतन आनंद आहे, मी शिव आहे.
मी विशुद्ध उर्जेच्या रुपात सर्व ठिकाणी आहे, सर्व इंद्रियांत आहे.
मला कशाची आसक्ती नाही, पण मी विरक्तही नाही.
मी विशुद्ध उर्जा आहे, चिरंतन आनंद आहे, मी शिव आहे.
अध्यात्मामध्ये एखादी पातळी गाठण्या करता डिटॅचमेंट या गोष्टीची गरज असते असे वारंवार सांगितले जाते. मग अशा प्रकारची डिटॅचमेंट कशी येईल यासाठी अनेक साधने असतात. मग त्यामध्ये ध्यानधारणा, तप, जप, साधना, तीर्थयात्रा अशा प्रकारच्या साधनांचा उपयोग केला जातो. इतके सगळे करून देखील डिटॅचमेंट येत का नाही हा प्रश्न देखील विचारला जातो.
यावरती सगळ्यात उच्च दर्जाचे उत्तर हे एका माणसाने देऊन ठेवलेले आहे. त्या माणसाचे नाव अष्टावक्र. अष्टावक्र संहिता म्हणजे एका प्रकारचे जालीम औषध. त्याचे प्रत्येक वाक्य हे इतक्या उच्च दर्जाचे आहे की त्या वाक्याचे मनन करता करताच कधी ध्यान लागून जाईल हेही सांगता येत नाही. अष्टावक्र आणि जनकराजा यांच्यातील संवाद हा अष्टावक्र संहीता किंवा अष्टावक्रगीता या नावाने ओळखली जाते.
जनक राजा अष्टावक्र ऋषी यांना विचारतो की आयुष्यामध्ये डिटॅचमेंट कशी यावी.? आपल्यापासून गोष्टी कशा सुटतील किंवा आपणच या गोष्टींपासून कसे सुटू शकतो.?
यावरचे अष्टावक्र या केवळ बारा वर्षांच्या ऋषी चे उत्तर इतके समर्पक आहे.
अष्टावक्र सांगतात.. तू स्वतःला कशा पासून वेगळे करण्याचा प्रयत्न करतोयस.? तू कधी कशात अडकलेलाच नव्हतास. खोलवर विचार करून पहा की तु खरोखर कशात अडकलेला आहेस का? लहानपणापासून तू कितीतरी जागा बदलल्यास, माणसे बदलली, नाती बदलली गेली, प्रत्यक्ष तुझं शरीर आणि मन हे देखील बदलत गेलेले आहे. त्यामुळे कुठल्याच गोष्टीची तू कधी अटॅच नव्हतासच. आपण एखाद्या गोष्टीशी अटॅच होत ही झाली तुझ्या मनाची धारणा.
तू कधीही ना शरीराशी, ना मनाशी ना बुद्धिमत्तेशी जोडलेला होतास. आत्ताचा हा क्षण चालू आहे तोदेखील निघून जाईल व त्याच्याशी देखील तू जोडलेला नाहीस. प्रत्येक गोष्ट ही तुझ्या समोरून निघून जाते आहे. केवळ तुझ्या मनाला वाटते म्हणून तुला असे वाटत आहे की तू जोडलेला आहेस. परंतु तू कशाशीच attach नाहीस आणि तू कशानेच बांधलेला नाहीस. प्रत्येक गोष्ट जी तू अनुभवली आहेस ती तुझ्या समोर आली आणि निघून देखील गेली त्यामुळे तू कशानेच बांधलेला नहीयेस.
या जगातील सगळ्यात उच्च दर्जाची जाणीव किंवा अटॅचमेंट म्हणजे आई आणि मुलांमधील अटॅचमेंट. मुल लहान असताना तर ती सर्वात जास्त असते. परंतु जेव्हा आई झोपी जाते आणि गाढ निद्रेत प्रवेश करते त्यावेळी तिच्या मनात ना तिचे मूल असतं ना तिचं मन असतं ना तिची बुद्धी असते. गाढ झोपेमध्ये तिच्या स्वतःच्या शरीराबद्दल आणि मुलाबद्दल कोणतीही काळजी तिच्या मनात नसते आणि असे असतानादेखील स्वखुशीने तिला त्या अवस्थेत जायला आवडते. म्हणजेच त्या अवस्थेत आई देखील आपल्या मुलाशी बांधलेली असत नाही . त्यामुळे ही बांधिलकी फक्त तुझे शरीर आणि मन याच्याशी निगडित आहे. त्यापलीकडे खरा जो तू आहेस तो कधीच कशाशी जोडलेला नव्हता आणि कधीच कशाशी जोडलेला नसतो.
त्याच पद्धतीने मुल देखील आईशी केवळ त्याच्या गरजेपुरतेच बांधलेले असते. एकदा लहान मूल झोपले की ना त्याला आईची आठवण असते. किंवा त्याला आई आपल्याजवळ आहे की लांब आहे याची जाणीव नसते. ना त्याला या गोष्टीचे दुःख असते. म्हणजेच कोणी कोणाशी बांधलेले असे नाहीच.
हे राजा अता मला सांग की तू कशापासून सुटायचं विचारत आहेस.?
जे लोक ब्रेकप मुळे किंवा बाकीच्या घटनांमुळे अत्यंत व्यथित होतात आणि निराश होतात त्यांनी या गोष्टीचा विचार करावा की ब्रेकप झाल्यामुळे त्यांच्या झोपेमध्ये त्यांना जी काही स्वप्ने पडली किंवा गाढ झोपेमध्ये गेल्यावर तर सगळ्याच गोष्टींचा विसर पडला त्यावेळेला तुम्हाला तुमचे आप्तस्वकीय वा प्रियकर / जोडीदार का आठवला नाही.? कारण आपण कोणावर प्रेम करतोय किंवा आपले कोणाशी तरी अटॅचमेंट आहे ही केवळ जागृत असताना मानसिक लेव्हलला जाणवणारी गोष्ट आहे. आतमध्ये जो कोणी तू म्हणून आहेस त्याला या गोष्टींचा काहीएक फरक पडत नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट हे तुमचे शरीर किंवा मन किंवा बुद्धी यांच्याशी जोडलेले आहे तुमच्याशी नाही. खरोखर या पद्धतीने जो व्यक्ती खोल विचार करून आत पर्यंत पोहोचू शकतो त्याच्यासाठी दुःख किंवा व्यथा किंवा सुख या सर्व गोष्टी संपत जातात. मी केवळ एक निरीक्षण करणारा आहे हे जेव्हा समजत जाते तेंव्हा उरते ते केवळ निष्काम कर्म. वर्तमानात जगणे किंवा चालू क्षणांमध्ये जगणे आणि जे समोर आहे ते करत राहणे आणि त्यापासून मिळणारे फळ काहीही असले तरी त्याबाबत कोणतीही तक्रार नसणे. या अवस्थेमध्ये उरतो तो निखळ आनंद. या अवस्थेत ना सुख असते ना दुःख.
इतके जबरदस्त उत्तर हे कोणीच दिलेले नाही. असे उत्तर ना गीते मध्ये सापडते ना भागवतामध्ये. या गीतेला अद्वैत वेदान्तामध्ये सर्वोच्च दर्जाचे पुस्तक मानले जाते. अष्टावक्रगीता वाचण्या पूर्वी सुरुवातीला उपनिषदे व बाकी लोकांनी सांगितलेला अद्वैत वेदांत माहित असणे फार गरजेचे आहे.
# ज्ञानी माणसाला विक्षेप नसल्याने विक्षेपनिवृत्तीकरिता त्याला समाधीचा प्रयत्न करावा लागत नाही .द्वैतभ्रम नष्ट झाल्याने त्याला कुठलाही बंध असत नाही .हे सर्व जगत कल्पित आहे हे जाणून तो निर्विकार चित्तदशेत असतो.
# जो मनुष्य अहंकाररहित झाला तो लोकदृष्टीने कर्म करीत नाही किंवा करतो असे वाटले तरी कर्तृत्वाचा अहंभावच नाहीसा झाल्याने ,त्याला संकल्प -विकल्पाचे स्फुरण होत नाही.
# जीवनमुक्तांचे चित्त कर्तृत्वरहित संकल्पविकल्परहित व संदेहमुक्त असल्याने त्याला कशाचा खेद होत नाही किंवा कशाने तो संतोष पावत नाही.
# ज्ञान्याचे चित्त संकल्प-विकल्परूप चेष्टिते करण्यास प्रवृत्त होत नाही , कारण चित्ताची निर्मल व निश्चल अवस्था झाल्याने ते 'स्व' रूपात लीन होते.
# अज्ञानी माणसे चित्ताचा निरोध करून एकाग्रतेचा खूप अभ्यास करतात , परंतु ज्ञानी पुरूष गत कालातील कर्माचा अथवा भविष्यकालातील संकल्पांचा विचार न करता वर्तमानकालात राहून आपल्या 'स्व'रूपात लीन असतात.