Thursday, March 16, 2023

राहु वक्रीच असतो. स्पष्ट राहू काही काळासाठी मार्गी आणि स्तंभि हि होतो ही एक गणितीय चुक आहे.

  राहु वक्रीच असतो. स्पष्ट राहू काही काळासाठी मार्गी आणि स्तंभि हि होतो ही एक गणितीय चुक आहे. मार्गी आणि स्तंभि राहू हे अवैज्ञानैक आणि अंधश्रद्धा तयार करणे आहे.

राहू व केतु हे चंद्र आणि पृथ्वीचे छेदन बिंदु आहेत. राहू व केतु
मार्गी किंवा स्तंभि होणे म्हणजे पृथ्वीची गती ऊलटि होणे अथवा थांबणे होय. हे अवैज्ञानैक आहे.

राहू आणि केतु ज्या दोन बिंदूंत चंद्राचा परिभ्रमण मार्ग क्रांतिवृत्ताला काटतो त्या बिंदूंपैकी एकास राहू (इंग्रजीत Anabibazon किंवा Caput Draconis - Ω) आणि दुसऱ्याला केतू (Cauda Draconis किंवा Catabibazon - ʊ) म्हणतात. या बिंदूंपैकी कोणत्याही बिंदूवर सूर्य किंवा चंद्र आला की ग्रहण होते. असे झाले की राहू किंवा केतूने सूर्य/चंद्राला ग्रासले किंवा गिळले असे म्हटले जाते.

स्पष्ट व मध्यम (सरासरी) या राहूच्या गती मानतात. राहूच्या खऱ्या दृष्य गतीवरून राहूची गणना करणे म्हणजे स्पष्ट राहू, व राहूची दैनंदिन सरासरी गती घेऊन त्याच गतीने राहूची गणना करणे म्हणजे मध्यम राहू.

राहू-केतु यांची गती हा मध्यम राहू पध्दतीने गणित करून काढला जातो.
या पध्दतीत राहू व केतु हे दररोज ३.१० कला इतके आपल्या वक्री गतीने मागे सरकतात असे समजून गणित केले जाते.

दाते पंचांगकर्ते स्पष्ट राहू देतात याचे कारण सांगताना ते सांगतात कि सर्व ग्रह स्पष्ट देत असल्याने राहू हि स्पष्ट द्यावा. आता स्पष्ट राहू घेतल्यास ज्योतिषांसमोर हि समस्या येईल कि, स्पष्ट राहू काही काळासाठी मार्गी हि होतो. आणि स्तंभिही, मग हि गोष्ट पत्रिकेत नमूद करावी लागेल. तर मध्यम राहू हा नेहमी वक्र गतीनेच जाईल.
--------------------------------------------------

No comments: