1.
आलिया भोगासी असावे सादर । देवावरी भार घालूनिया ।।
मग तो कृपासिंधु निवारी सांकडे । येर ते बापुडे काय रंक ।।
भयाचिये पोटी दुःखाचिये रासी । शरण देवासी जाता भले ।।
तुका म्हणे नव्हे काय त्या करिता । चिंतावा तो आता विश्वंभर ।।
कारण ते म्हणतात आपले भोग हे आपल्याच पूर्व कर्मांची फळे असल्याने त्यांना सामोरे जाण्यास मनुष्याने नेहमी तत्पर असावे. ती चुकवण्याचा किंवा त्यांना टाळण्याचा केव्हाही प्रयत्न करू नये.
उलट भोग भोगणे व त्याद्वारे प्रायश्चित्त घेणे हे न्यायाचेच असते हे लक्षात घेऊन आलेल्या भोगांना मोठ्या धीराने सामोरे जावे व दुसरीकडे आपली सर्व काळजी, सर्व चिंता देवाच्या पायी वाहून आपला सर्वभार देखील त्याच्या शिरी घालावा व त्याला सर्वभावे शरण जावे.
कारण तसे केल्यानेच मग तो कृपासिंधू आपल्याला स्वतःच्या छत्रछायेखाली घेतो व आपण कितीही पापाचे धनी असलो तरीही आपला पाठीराखा होतो व आपल्यावरिल संकटाचे निश्चितपणे निवारण करून आपले रक्षण करतो. ती दूर करतो. आणि एवढेच नव्हे तर आपला सर्वभार देखील स्वतःच्या शिरि घेतो.
अभंग १६३६
--------------------------------------------------------------------------------------------------
2.
कर्मविपाक सिद्धांत
‘मी अशी काय पापे केली होती, म्हणून माझ्या नशिबी हे भोग आले?’ असे वाक्य आपल्याला अनेकदा ऐकायला मिळते. समोर उभ्या ठाकलेल्या अवघड प्रसंगाने गांगरून गेलेली अगर परिस्थितीसमोर हताश झालेली व्यक्ती आपल्या नातलगांना, मित्र-मैत्रिणींनी किंवा वेळप्रसंगी देवाला हा प्रश्न विचारून मोकळी होते. अशा प्रश्नाद्वारे ती व्यक्ती एका प्रकारे कर्मसिद्धांतास मान्यता देत असते.
आपण केलेले कर्म आणि आपल्याला मिळणारे फळ यातील संबंध कर्मसिद्धांत स्पष्ट करतो. हा सिद्धांत असे सांगतो, की मनुष्याला त्याच्या चांगल्या कर्माचे (पुण्याचे) चांगले आणि वाईट कर्माचे (पापाचे) वाईट फळ मिळते. हा कार्यकारणभाव केवळ एका जन्मापुरता नसून जन्मोजन्मी चालू राहणारा असतो. एका जन्मात केलेल्या कर्माचे फळ भोगून संपले नाही, तर पुढील जन्मात ते फळ भोगावे लागते. म्हणजेच, मृत्यूही कर्मफलातून आत्म्याची सुटका करू शकत नाही.
गतजन्मातील स्मृती सर्वसाधारण माणसाला नसल्यामुळे, वाईट प्रसंगास सामोरे जावे लागले, की हे पूर्वीच्या वाईट कर्माचे फळ असले पाहिजे, असा समज तो करून घेतो. मग कारण तर माहीत नाही; परंतु कार्य तर अनुभवाला येत आहे, अशी त्याची विचित्र परिस्थिती होते. कधी कधी समाजामध्ये असेही पहायला मिळते, की वाईट कर्मे करणारी माणसे सुखात आहेत आणि सत्कर्मे करणारी माणसे मात्र दुःखात दिवस कंठत आहेत. यामुळे मग कर्मसिद्धांत खरा नसावा, असेही वाटू लागते. नक्की चांगले काय आणि नक्की वाईट काय, याविषयी देखील संभ्रम उत्पन्न होतो.
आज समाजात अनेक दुष्कर्मे करूनही काही माणसे श्रीमंत व प्रतिष्ठित झालेली दिसतात, त्याचे कारण वर्तमानातील त्यांचे कर्म जरी खराब असले तरी त्याचे दुष्फळ भविष्यात निश्चित मिळणार असते. वर्तमानात चालू असलेला भरभराटीचा काळ , हे त्याच्या पूर्व कर्माचे फळ असते, याच्यावर विश्वास ठेवावाच लागेल.
ज्या व्यक्तीने कर्माची आणि प्रारब्धाची शक्ती जाणली आणि मानली, त्या व्यक्तीची कर्माचे भोग भोगताना भक्कम मानसिक तयारी आपोआप होत असते. कर्म आणि प्रारब्ध चुकणार नाही याचे भोग भोगावेच लागतात.
भगवत गीता
आसक्ती सोडून तसेच यश आणि अपयश यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग म्हटले जाते. समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो. अर्थात त्यापासून मुक्त असतो. हा समत्वरूप योगच कर्मांतील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------
3.
जेंव्हा या जन्मातील बरीवाईट कृत्ये व या जन्मातील भोगावी लागणारी सुखदु:खे यांचा सुसंगत मेळ जमवता येईना तेंव्हा असे मत मांडले गेले कीं मागे या माणसाचा जन्म होता व त्यावेळी त्याने केलेल्या चांगल्या कृत्यांची चांगली फळे त्याला आज मिळत आहेत मग भले तो आज वाईट वागेना का ! आज सज्जन असणार्या माणसाने मागील जन्मी पाप केले असेल तर त्याला त्याचे फळ आज भोगलेच पाहिजे. मागचा जन्म म्हटले कीं पुनर्जन्म आला व कर्माची फळे चुकत नाहीत हा कर्मविपाक सिद्धांत.
काही कर्मे मागील जन्मातील असतात. त्यांची फळे अजून भोगावयास सुरवात करावयाची असते.त्या पैकी काहींची सुरवात सुरू झालेली असते. काही चालू जन्मातील असतात.यांना निरनिराळी नावे दिली आहेत. यातील काही स्पष्ट अर्थ माहीत नसला तरी गोळाबेरिज अर्थ व्यवहारात नेहमी वापरले जातात.
(१) संचित : कोण्याही मनुष्याने सांप्रतच्या क्षणापर्यंत केलेले कर्म म्हणजे संचित. ते मागच्या जन्मातील व या जन्मातील केलेया कर्मांची बेरीज.
याला अदृष्ट किंवा अपूर्व असेही म्हणतात. अदृष्ट म्हणावयाचे कारण करतेवेळी कर्म दृश्य असते पण नंतर ते केवळ परिणाम रूपाने शिल्लक राहते.
(२) प्रारब्ध : संचित कर्मांची फळे एकदम भोगता येत नाहीत. ती परस्पर विरोधीही असतात. बरीवाईट फळे एकाचवेळी कशी भोगणार ? जी कर्मे फलोन्मुख झालेली असतात म्हणजे ज्यांची फळे मिळावयास सुरवात झालेली असते त्यांना प्रारब्ध म्हणतात.
(३) क्रियमाण : प्रारब्ध भोगत असतांना तुम्ही या जन्मीही कर्मे करत असताच. अशा कर्मांना क्रियमाण वा कर्मे म्हणतात. वर सांगितल्याप्रमाणे या कर्माचे फळ तात्काळ मिळाले तर भो्ग तेथेच संपतो. पण तसे झाले नाही तर पुढी्ल जन्माकरिता तो तुमच्या खात्यात जमा होतो.
असा हा चक्रव्युह आहे. मागील जन्मांची फळे आज भोगा व या जन्माची फळे भोगावयास पुढचा जन्म घ्या. यातून सुटका कधीच नाही कां ? नसेल तर सगळेच निरर्थक ठरेल. आहे. सुटकेचा मार्ग आहे. कर्म करूच नका. फळ नाही, पुनर्जन्म नाही. अर्जुनाने हाच मुद्दा मांडला. भगवान म्हणाले “मुर्ख आहेस. कर्मे चुकत नाहीत. जगतो आहेस तोवर कर्मे करावीच लागतात.” हा ही मार्ग खुंटल्यावर भगवान दिलासा देतात. तेच गीतेचे मर्म म्हणावयास हरकत नाही. फळे कर्म केले म्हणून मिळत नाहीत. त्या कर्मामागे तुमची जी वासना आहे, कामना आहे त्यामुळे फळे मिळतात. कामना नसेल तर कर्म करूनही फळ मिळणार नाही. तेव्हा भगवंतांचे सांगणे असे की निष्काम बुद्धीने, फळे मला अर्पण करून युद्ध कर, या कर्माची बरीवाईट फळे तुला भोगावी लागणार नाहीत.
--------------------------------------------------------------------------------------------------
4.
प्रत्येक जीवात्मा हा त्याच्या पूर्व कर्मानुसार आणि वासनेनुसार (Desire) जन्म घेत असतो. काही वेळेला तो गतजन्मांतील ऋण वसूल करण्यासाठी जन्म घेत असतो तर काही वेळेला गतजन्मातील ऋण फेडण्यासाठी जन्म घेत असतो. त्या जीवात्म्याला ते ते कर्म भोग मग ते चांगले असेल किंवा वाईट असेल ;त्या त्या प्रकारानुसार भोगण्यासाठी सभोवतालचे वातावरण,परिस्थिती लाभत असते.
जीवात्म्याच्या जन्माबरोबर त्याला त्याच्या पूर्व कर्मानुसार आई,वडील,भाऊ,बहीण, बायको,मुले,इतर नातेवाईक,मित्र मंडळी भेटत असतात. इथे योगायोग असा प्रकार नसतो. या सर्व गोष्टी नियतीनुसारच होत असतात. कोणी कोणालाच योगायोगाने भेटत नसतो. वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जीवात्म्याला एकमेकांचे ऋण फेडायचे असतात किंवा ते वसूल करून घ्यायचे असतात.
काही वेळेला जीवात्म्याचे त्याच्या नाते संबंधातील जीवात्म्यांशी मग ते आई,वडील,भाऊ,बहीण, बायको,मुले,इतर नातेवाईक,मित्र मंडळी यांच्याशी पटत नसते.याचे मूळ बऱ्याचदा पूर्व जन्मात सापडते. त्यामुळे नाते असून सुद्धा ते टिकत नसते याला कारण पूर्व जन्मातील त्या जीवात्म्याचे दुसऱ्या जीवात्म्याशी वागणे असते. काही जणांशी आपले चांगले जमते काही जणांशी नाही जमत. ऑफिस ,उद्योग धंदे इथे अशा अनेक व्यक्ती भेटत असतात ज्यांच्याशी जमते पण काही जणांशी अजिबात जमत नाही.
अशा वेळी ते पूर्वजन्मातील प्रेम,सदभावना किंवा वैर,शत्रुत्व जीवात्मा आत्ताच्या जन्मात वसूल करायला सुरवात करतो आणि असे चक्र चालूच राहते आणि नवनवीन कर्म बंधन निर्माण होत जाते.हे कर्मबंधन न्यूट्रलाइझ करण्यासाठी प्रार्थना,क्षमायाचना कामी येते. जी लोकं आपल्याला आत्ताच्या जन्मात त्रास देत असतात त्यांना आपण आधीच्या जन्मात त्रास दिलेला असतो. अशा लोकांबरोबर संबंध सुधारण्यासाठी सुद्धा प्रार्थना,क्षमायाचना कामी येत असते.
अशा व्यक्तीची क्षमा याचना करून त्याच्याकडून माफ करवून घेऊन किंवा त्याला माफ करून टाकून आपले कर्म बंधन न्यूट्रलाइझ करणे आवश्यक ठरत असते. हि सगळी थॉट प्रोसेस समोरच्या व्यक्तीच्या थॉट प्रोसेस वरती परिणाम करत असते. एका जीवात्म्याचे अंतर्मन दुसऱ्या जीवात्म्याच्या अंतर्मनाला अशा प्रकारे साद घालत असते.
आपल्या कोणत्या जन्मातील कोणते कर्म कधी फळाला येईल याची आपल्याला कल्पना नसते त्यामुळे आपण प्रयत्न पूर्वक जन्मो जन्मीच्या साठलेल्या कर्म बंधनातून सुटका करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे ठरते.
प्रत्येक जीवात्मा हा त्याच्या पूर्व कर्मानुसार आणि वासनेनुसार (Desire) जन्म घेत असतो. काही वेळेला तो गतजन्मांतील ऋण वसूल करण्यासाठी जन्म घेत असतो तर काही वेळेला गतजन्मातील ऋण फेडण्यासाठी जन्म घेत असतो. त्या जीवात्म्याला ते ते कर्म भोग मग ते चांगले असेल किंवा वाईट असेल ;त्या त्या प्रकारानुसार भोगण्यासाठी सभोवतालचे वातावरण,परिस्थिती लाभत असते. त्या नुसार जीवात्मा जन्म घेतो व पत्रिका बनते.
थोडक्यात पत्रिका ही कर्मफल आहे.
Every living soul is born according to its past karma and desire. Sometimes he is born to recover the debt of the previous life and sometimes he is born to repay the debt of the previous life. The soul enjoys that karma, whether it is good or bad; According to that, the soul is born and becomes a Horoscope.
In short, the Horoscope is karma.
--------------------------------------------------------------------------------------------------
5.
एक माणुस श्रीमंत तर दुसरा गरीब, एकाच अपघातांत दोन मरतात तर चार वाचतात,असे का?असे प्रश्न सर्वांनाच पडतात.ह्या अशा तऱ्हेच्या प्रश्नांना उत्तर म्हणून कर्म विपाकाचा सिध्दांत मांडण्यात आला.
१] प्रत्येक कर्माचे फ़ळ मिळतेच. उदा. निखाऱ्यावर पाय पडला तर पाय भाजतो.पाय पडणॆ हे कर्म तर पाय भाजणे हे फळ. फळ लगेच मिळाले.म्हणजे कर्म घडले पण फ़ळ मिळाले नाही. सिध्दांत म्हणतो फ़ळ मिळणारच, आज नाही, उद्या नाही तर पुढच्या जन्मात तरी नक्कीच.
२]ह्या जन्मातल्या कर्माचे फ़ळ भोगावयास पुढील जन्म म्हटले की या जन्मातील भोग हे मागिल जन्मातील कर्मांची फ़ळॆ झाली. अशा रीतीने जन्मोजन्मांचे रहाटगाडगे सुरु होते.
३] कर्माच्या गुणवत्तेनुसार फ़ळे बदलतात. चांगल्या कर्मांची चांगली फ़ळे उदा, स्वर्गप्राप्ती, श्रीमंत, सत्शील, घरांत जन्म. वाईट कर्मांची फ़ळे ,नरकवास,कष्टी जगणे वगैरे.
४] अर्जुनाने भगवानांना हेच विचारले. तो म्हणाला "मी कर्म करतच नाही.युध्द केले नाही म्हणजे झाले.कर्म नाही फ़ळ नाही." भगवान म्हणाले,". जोवर इन्दिये आहेत तोवर प्रकृती कर्म घडवतच रहाणार. ह्यांत तुझ्या इच्छेचा प्रश्नच नाही. कर्मे अटळ, अपरिहार्य आहेत’"
[गी.३.५] फ़ळे भोगावयास जन्म घ्या,त्या जन्मात कर्मे करा,त्यांची फ़ळे भोगावयाला परत जन्म घ्या. सुटका कशी करून घ्यावयाची?
५] भगवान म्हणतात " कर्माची फ़ळे मिळतात हे तितकेसे बरोबर नाही. तर कर्म करण्यामागे जी इच्छा,कामना, फ़ळाची आशा असते त्याचे फ़ळ मिळते.उदा. मी सार्वजनीक कामाकरिता पैसे दिले,कारण इह लोकी मला मानमतराब मिळेल,मृत्युनंतर स्वर्ग मिळेल. कर्म चांगलेच आहे,पण त्यामुळे त्याचे [चांगले] फ़ळ चुकणार नाही.
६] कर्म करतांना एक गोष्ट महत्वाची आहे. आपण काय करावयाचे, कसे करावयचे याचे पूर्ण स्वातंत्र्य माणसाला आहे. त्यांत ईश्वरही हात घालत नाही.गरीबींत जन्म येणे हे प्राक्तन; पण त्या गरीबींत कसे वागावयाचे हे तुम्हीच ठरवावयाचे.फ़ार फ़ार तर ईश्वराची भक्ती केल्यास तो तुम्हाला मन:सामर्थ्य वाढवावयास मदत करेल.दुबळ्या,सहज भरकटणाऱ्या मनास ताळ्यावर आणावयास भक्ती हा एक सोपा मार्ग आहे.
७] कर्माचे नियम फ़क्त मानवाला लागू आहेत.इतर योनी तुमच्या कर्माची फ़ळे आहेत. तुम्हाला कुत्र्याचा जन्म आला तर तो भोग भोगून परत पुढच्या जन्माची सुरवात. कुत्र्याच्या जन्मात तुम्ही कर्म करत नाही. मानव जन्म दुर्मीळ व देवांनाही हेवा करावयाला लावणारा आहे याचे कारणही मानवालाच मोक्ष मिळू शकतो हेच आहे.
८] गीतेनुसार फ़ल आशा सोडून केलेल्या कर्मांमुळे नवीन फळे निर्माण होत नाहित. मागील फ़ळे भोगून झाल्यावर तुम्ही मोक्ष मिळवू शकाल.कारण तुमची बरी-वाईट फ़ळे संपली तर परत जन्म नाही.हाच मोक्ष.
९]कर्मे अनंत प्रकारची असल्यामुळे त्यांची विभागणी निरनिराळ्या प्रकारे केली आहे. वानगीदाखल : कर्म, अकर्म,विकर्म,नैष्कर्म,नित्य, काम्य, नैमित्तिक,वैदिक तांत्रिक, कायिक, मानसिक, सात्विक , राजस, तामस, श्रौत, स्मार्त,इत्यादि.
१०]कर्म सिध्दांतानुसार आपला जन्म होतो. तोच फ़ल ज्योतिषाचा संबंध. त्यामुळे दैवी ऊपायांच्या अंधश्रद्धेच्या मागे लागु नये.
--------------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment